उन्हाळी भुईमूग
मार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू नये.
निंदणी व कोळपणी करून पिकातील तणाचे नियंत्रण करावे.
मावा, तुडतुडे, पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रण करावे. नियंत्रण - फवारणी प्रति लिटर डायमिथोएट (३० टक्के) १ मि.लि. किंवा स्पिनोसॅड (४५ एस.पी.) ०.३ मि.लि.
टिक्का रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास फवारणी करावी. नियंत्रण - फवारणी प्रतिलिटर पाणी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा मॅंकोझेब २.५ ग्रॅम. सूचना : दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने पुन्हा करावी.
तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फवारणी करावी. नियंत्रण - फवारणी प्रतिलिटर पाणी मॅंकोझेब ६३ टक्के अधिक कार्बेन्डाझिम १२ टक्के (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम
लाेहाची कमतरता आढळल्यास फेरस सल्फेट ०.५ टक्के याप्रमाणात (५० ग्रॅम प्रति १० लिटर) फवारणी करावी.
उन्हाळी सूर्यफूल :
पेरणीनंतर ३० दिवसांनी हेक्टरी ३० किलो नत्र युरियाद्वारे द्यावे.
निंदणी करून पीक तणविरहित ठेवावे.
पाण्याच्या पाळ्या ८-१० दिवसांच्या अंतराने द्याव्यात.
पिकास बोंडे लागणे, फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये.
केसाळ अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास किडग्रस्त पाने अंडीपुंज अळ्यासहित तोडून रॉकेलमिश्रित पाण्यात बुडवावीत. त्यानंतर फवारणी करावी. नियंत्रण - फवारणी प्रतिलिटर पाणी क्विनॉलफॉस २ मि.लि.
पानांवरील काळे ठिपके (अल्टरनेरिया) रोगाचे नियंत्रण करावे. नियंत्रण - फवारणी प्रतिलिटर पाणी मॅंकोझेब २.५ ग्रॅम
विषाणू उदा. केवडा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास रोगग्रस्त झाडे उपटून टाकावीत. रोगप्रसारक किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी. नियंत्रण - फवारणी प्रतिलिटर पाणी डायमिथोएट (३० टक्के) १ मि.लि.
पीक फुलावर असताना सकाळी ८ ते १० वाजेच्या दरम्यान तळहाताला सुती कपडा बांधून फुलावरुन हात फिरवावा किंवा एक फूल दुसऱ्या फुलावर हळुवार घासल्यास फुलामध्ये दाणे भरण्याचे प्रमाण वाढते.
उन्हाळी सोयाबीन :
खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी उन्हाळी हंगामात सोयाबीन पीक घेतले आहे. ढगाळ वातावरणात त्यावर बुरशीजन्य करपा, तांबेरा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
बुरशीजन्य करपा
नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी
मॅंकोझेब २.५ ग्रॅम
तांबेरा रोग नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी मॅंकोझेब ६३ टक्के अधिक कार्बेन्डाझिम १२ टक्के (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम
भाजीपाला पिके :
कांदा पिकास पाण्याच्या पाळ्या ७ ते ८ दिवसांच्या अंतराने द्याव्यात.
कांदा पिकावर फूलकिडीचा प्रादुर्भाव आढळल्यास फिप्रोनील (५ टक्के इ.सी.) २ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कांदा बीजोत्पादनात पिकाच्या धांड्यावर रसशोषण करणाऱ्या किडींमुळे लिफब्लॉचचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी डायमिथोएट १ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
उन्हाळी मिरचीस ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
मिरची पिकावरील तुडतुडे, फूलकिडे व कोळी यांच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट (३० टक्के) १ मि.लि. अधिक ८० टक्के विद्राव्य गंधक २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात मिसळून फवारणी करावी.
फेब्रुवारी महिन्यात लावलेल्या टोमॅटो पिकास १० दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.
फ्लॉवर पिकाच्या गड्ड्यांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पिकाची पाने खाली गड्ड्यावर बांधावीत. त्यामुळे गड्डे पिवळे पडणार नाहीत.
वांगी, भेंडी, दिलपसंत (टिंडा), घोसाळी , गवार, काकडी, शिरीदोडका या भाजीपाला पिकात तणनियंत्रण करावे. तसेच पाण्याच्या नियमित ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाळ्या द्याव्यात.
टीप : काही कीटकनाशक लेबल क्लेमनुसार आहेत तर काही विद्यापीठाच्या शिफारशी आहेत.
संपर्क : डॉ. यु. एन. आळसे, ७५८८०८२१३७ कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, डाॅ.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.)
Source: agrowon
No comments:
Post a Comment