Thursday, April 20, 2023

२ लाख पर्यंत मदत..महाराष्ट्र सरकारनं ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ जाहीर केली आहे 🔥🔥👌

जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप :👇


Join Here


Please join WhatsApp group for similar posts:👇


Join Here

🔥🔥🔥

महाराष्ट्र सरकारनं ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत 12 हून अधिक प्रकारच्या अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास शेतकरी कुटुंबाला 2 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. वाचा या योजनेची संपूर्ण माहिती.


नेमकी ही योजना काय आहे? 👇


या योजनेसाठी पात्रतेचे निकष काय आहेत? 👇


या योजनेअंतर्गत कोणत्या प्रकारचे अपघात पात्र आणि अपात्र असणार आहेत? 👇




या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा?


अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडायची? 👇



Source : BBC News Marathi Twitter account


जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप :

Join Here

Please join WhatsApp group for similar posts:

Join Here

Friday, April 14, 2023

या ॲप मध्ये बघू शकता कुठे पाऊस सुरू आहे, कुठे विजा सोबत पाऊस आहे. ☁️

भारतीय हवामान ☁️ विभागाने बनवलेलं (IMD) हे ॲप आपण पाऊस कुठे पडत आहे तसेच चक्रीवादळ,विजा, किंव्हा गारांचा पाऊस कुठे आहे हे सगळं बघू शकतो.👇
जसे की वरच्या फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे महाराष्ट्र मध्ये मराठवाडा तसेच मुंबई मध्ये पाऊस सुरू आहे.
तसेच साऊथ इंडिया मध्ये हे पाऊस सुरू आहे.
स्वतः नोंद करू शकतो:
आपण स्वतः पण या मध्ये टाकू शकतो जर आपल्या इथे पाऊस होत असेल तर नोंद करू शकतो जेणेकरून दुसरे बघू शकतात.
भरपूर उपयोगी ॲप्लिकेशन आहे, याचा उपयोग आपण करू शकतो.
ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा:👇
धन्यवाद🙏

Wednesday, April 12, 2023

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त, भारतीय हवामान विभागाचे मोबाईल ॲप्स☁️ weather apps

मेघदूत हवामानावर आधारित शेती व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना मदत करतात
 मेघदूत, भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD), भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) यांचा संयुक्त उपक्रम, शेतकर्‍यांपर्यंत अत्यंत सोप्या आणि वापरण्यास सोप्या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. आयआयटीएम, पुणे आणि आयएमडी, दिल्ली यांच्या सहकार्याने इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी-अरिड ट्रॉपिक्स (ICRISAT), हैदराबाद येथे डिजिटल कृषी संशोधन थीमद्वारे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले गेले. अ‍ॅप प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी अ‍ॅग्रो मेट फील्ड युनिट्स (AMFU) द्वारे जारी केलेल्या संदर्भानुसार जिल्हा आणि पीकनिहाय सूचना एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बोटांच्या टोकापर्यंत अंदाज आणि ऐतिहासिक हवामान माहितीसह एकत्रित करते. जेथे उपलब्ध असेल तेथे स्थानिक भाषेतही सूचना जारी केल्या जातात.

मौसम हे आयएमडीचे अधिकृत हवामान अनुप्रयोग आहे

 https://mausam.imd.gov.in/ वर उपलब्ध हवामान उत्पादनांचा अखंड आणि वापरकर्ता-अनुकूल प्रवेश प्रदान करण्यासाठी MAUSAM हे भारतीय हवामान विभाग (IMD), पृथ्वी विज्ञान मंत्रालय (MoES), भारत सरकारचे मोबाइल अॅप आहे. . वापरकर्ते निरीक्षण केलेले हवामान, अंदाज, रडार प्रतिमांमध्ये प्रवेश करू शकतात आणि येऊ घातलेल्या हवामान घटनांबद्दल सक्रियपणे चेतावणी देऊ शकतात. MoES च्या मान्सून मिशन कार्यक्रमांतर्गत ICRISAT ची डिजिटल कृषी आणि युवा (DAY) टीम आणि भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) यांच्याद्वारे अॅपचा विकास आणि उपयोजन संयुक्तपणे केले जात आहे.


IMD द्वारे ऑफर केलेले क्राउडसोर्सिंग वेदर अॅप
 अनुप्रयोग वापरकर्त्यांना स्थानानुसार हवामान माहिती प्रदान करतो. वापरकर्ते या अॅपवर त्यांची प्रतिक्रिया देखील देऊ शकतात. अॅपमध्ये दुहेरी मोड आहे: हवामान अभिप्रायासाठी जलद, प्रगत.

Join WhatsApp group for more information 


Tuesday, April 11, 2023

आधार कार्ड, pan card, driving license मिळतील एकाच ॲप मध्ये 👌.. कोणताच कागद सोबत वागवायची गरज नाही, सगळे कागद एक मोबाईल ॲप मध्ये मिळतील.

आजची पोस्ट आहे डीजिलॉकर ॲप बद्दल.👇

तुमचे आधार card, pan कार्ड, दहावी मार्कमेमो किंव्हा बारावी मार्क मेमो.
हे सगळे डॉक्युमेंट मिळतील फक्त एक ॲप वर ते म्हणजे डीजीलॉकर.
चार चाकी किंव्हा दोन चाकी वाहने आरसी book आणि लायसेन्स सुधा या ॲप मध्ये ठेवता येतं.
कोणताही डॉक्युमेंट ठेवण्यासाठी अगोदर तो सर्च करावं आणि नंतर डिटेल्स भरून ok करा म्हणजे तो ॲप मध्ये दिसेल.
आणि हे सर्व डॉक्युमेंट लिगल आहेत म्हणजे जर आरटीओ ऑफिसर ला जर डीजीलॉकर मधील लायसेन्स दाखवले तर ते ग्रायहे धरले जाते. आयटी ACT २००० नुसार

#adhaarcard pan card #Digilocker #digital india
धन्यवाद.🙏

मार्च २०२३ मधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी; शेतकऱ्यांना दिलासा !

अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मार्चमधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार आज राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला.


महसुली विभागनिहाय वितरित करण्यात आलेला निधी पुढीलप्रमाणे :

अमरावती विभाग – २४ कोटी ५७ लाख ९५ हजार,

नाशिक विभाग ६३ कोटी ९ लाख ७७ हजार,

पुणे विभाग ५ कोटी ३७ लाख ७० हजार,

छत्रपती संभाजी नगर ८४ कोटी ७५ लाख १९ हजार.

एकूण निधी- १७७ कोटी ८० लाख ६१ हजार

मार्च, २०२३ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत शासन निर्णय:

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बार्बीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र. सीएलएस-२०२२/प्र.क्र.३४९/म-३, दि. २७ मार्च, २०२३ अन्वये राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे सुधारित दर व निकष दि. १ नोव्हेंबर, २०२२ पासून लागू करण्यात आलेले आहेत.

राज्यात माहे मार्च, २०२३ (दि. ४ ते ८ मार्च व दि. १६ ते १९ मार्च, २०२३) या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसामुळे मुख्यत्वे : शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्केपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. राज्यात मार्च, २०२३ या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीबाबत अनुज्ञेय दराने शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव दि. ८ मार्च, २०२३ च्या शासन पत्रान्वये मागविण्यात आले होते. विभागीय आयुक्त, अमरावती, नाशिक, पुणे व औरंगाबाद यांच्याकडून विहीत नमुन्यात निधी मागणी प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

मार्च, २०२३ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिक व इतर नुकसानीसाठी एकूण रु. १७७८०.६१ लक्ष (अक्षरी रुपये एकशे सत्त्याहत्तर कोटी ऐंशी लक्ष एकसष्ट हजार फक्त) इतका निधी सोबतच्या प्रपत्रात दर्शविल्यानुसार जिल्हानिहाय वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

महसूल व वन विभाग शासन निर्णय: मार्च, २०२३ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


Sunday, April 9, 2023

PhonePay, Googlepay अकाउंट बँक मध्ये न जाता असे उघडा👏

India post payments Bank मध्ये अकाउंट ओपन करा.👇












सर्वात अगोदर👉 या लिंक वर जाऊन ॲप डाउनलोड करा

नंतर सर्व स्टेप्स फॉलो करून अकाउंट उघडा.

💁

अकाउंट ओपन झाल्यानंतर virtual डेबिट कार्ड साठी ॲप मध्ये रिक्वेस्ट करा.

नंतर PhonePay ॲप ओपन करा आणि त्या मध्ये लॉगिन करून डेबिट कार्ड ची माहिती भरा.

OTP verify झाल्यानंतर तुम्ही PhonePay किंव्हा Googlepay वापरू शकता.

तुम्हाला KYC करण्यासाठी एक वेळेस बँक मध्ये जावे लागेल फक्त.

टीप: तुम्ही दुसरी कोणतीही बँक वापरू शकता जसे की कोटक वगैरे पण पोस्ट ऑफिस बँक सगळ्या भारतात आहे म्हणून आम्ही हा ऑप्शन निवडा आहे.

यासाठी तुमचा आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.


Saturday, April 8, 2023

मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर अनुदान योजना – विहीर बांधण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान असं मिळवा !

कृषी योजना जिल्हा परिषद नियोजन विभाग महाराष्ट्र ग्रामपंचायत महाराष्ट्र पंचायत समिती महाराष्ट्र शासन निर्णय - GR वृत्त विशेष सरकारी योजना 
मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर अनुदान योजना – विहीर बांधण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान असं मिळवा !
 मनरेगा, सिंचन विहीर
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहिर खोदण्यासाठी 4 लाख रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय 4 नोव्हेंबर 2022 रोजी जारी करण्यात आला आहे, त्यानुसार, महाराष्ट्रात अजून 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदणं शक्य असल्याचं भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेन म्हटलं आहे. त्यामुळे मग विहिरीसाठी अनुदान मिळवायचं असेल तर यासाठीची पात्रता काय आहे, यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा, याचीच सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर अनुदान योजना – विहीर बांधण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान असं मिळवा !


नोव्हेंबर, २०२१ मध्ये निती आयोगाद्वारे प्रकाशित Multi-Dimensional Poverty Index प्रमाणे महाराष्ट्रात १४.९ टक्के कुटुंबे दारिद्रय रेषेखालील आहेत. त्यातच केरळमधील फक्त ०.७१ टक्के कुटुंबे दारिद्रय रेषेखालील आहेत. याचाच अर्थ भारतातील राज्यांना दारिद्रय संपवणे शक्य आहे. सर्व विदित आहे की, महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेचा जनक आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हा कायदा भारत सरकारने त्या आधारावरच केला आहे. काळपरत्वे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये बदल करण्यात आले असून त्यात वैयक्तिक लाभावर भर देण्यात आलेला आहे. अलीकडेच वैयक्तिक कामांमध्ये किमान ६० टक्के राशी खर्च करण्याचे निर्देश भारत सरकारकडून प्राप्त झाले आहे. अर्थात मनरेगा फक्त रोजगार देणारी योजना नसून विकासात भर घालणारी योजना आहे.

मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचे ठरविलेले आहे. भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून ३,८७,५०० विहीरी खोदणे शक्य आहे. मनरेगा अंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर (ठिबक / तुषार लावून) केला गेल्यास मोठ्या संख्येने कुटुंबे लखपती होतील व पर्यायाने महाराष्ट्र राज्य दारिद्रय कमी करण्याबाबतीत केरळच्या बरोबरीकडे वाटचाल करेल.

विभागामार्फत सदर्भाधीन शासन निर्णय दि. १७ डिसेंबर, २०१२ अन्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे अनुज्ञेय करण्यात आली आहेत. तद्नंतर शासन परिपत्रक दि. २१ ऑगस्ट, २०१४ अन्वये काही सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या. संदर्भाधीन क्र.३ च्या शासन परिपत्रकान्वये ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन सिंचन विहिरींची कामे मंजूर करण्याबाबत निर्देश देण्यात आले. तथापि, प्रत्यक्ष कार्यवाही करतांना सिंचन विहिरींच्या प्रस्तावाबाबत तसेच मंजूरीच्या कार्यवाहीबाबत विविध स्तरावरुन काही अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. सदर अडचणींच्या अनुषंगाने आणि वर उल्लेखित उद्दिष्ट प्राप्त करण्याच्या हेतूने वरिष्ठ स्तरावर चर्चा होऊन सिंचन विहरींसदर्भात (SOP) मानक ऑपरेटिंग प्रक्रिया निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने उपरोक्त नमूद संदर्भाधीन शासन निर्णय दि. १७ डिसेंबर, २०१२ व शासन परिपत्रक दि. २८ ऑगस्ट, २०२० अधिक्रमित करून शासन पुढीलप्रमाणे सुधारित सूचना देत आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे करतांना अधिनस्त कार्यालयास येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहिरींसंदर्भात पुढील सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.

लाभधारकाची निवड :-

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट १ कलम १ (४) मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे अनुज्ञेय आहेत.

अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती
भटक्या जमाती
निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)
दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे
शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
जमीन सुधारणांचे लाभार्थी
 इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियन २००६ (२००७ चा २) खालील लाभार्थी
सिमांत शेतकरी (२.५ एकर पर्यंत भूधारणा)
अल्प भूधारक (५ एकर पर्यंत भूधारणा)
लाभधारकाची पात्रता:

(अ) लाभधारकाकडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र सलग असावे.

(च) महाराष्ट्र भुजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम १९९३ च्या कलम ३ नुसार अस्तित्वातील पेयजल खोताच्या ५०० मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल खोताच्या ५०० मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये,

क) दोन सिंचन विहिरींमधील १५० मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.

दोन सिंचन विहिरीमधील किमान १५० मीटर अंतराची अट ही Run off Zone तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येऊ नये.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून १५० मी. अंतराची अट लागू राहणार नाही.
ङ) लाभधारकाच्या ७/१२ वर याआधीच विहीरीची नोंद असू नये.

ई) लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा. (Online)

फ) एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमीनीचे क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असावे.

(ग) ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे.

विहीरीसाठी अर्ज व त्यावरील कार्यपद्धती:

इच्छुक लाभार्थ्यांने विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ- अर्जाचा नमूना व ब- संमती पत्र सोबत जोडलेले) ऑनलाईन किंवा ग्रामपंचायतीच्या “अर्ज पेटीत टाकावे. ऑनलाईन व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्यांने शक्य तोवर ऑनलाईन अर्ज करावा.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :-

७/१२ चा ऑनलाईन उतारा.
८ अ चा ऑनलाईन उतारा.
जॉबकार्ड ची प्रत.
सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून ०.४० हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा.
सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र.
“अर्ज पेटी” दर सोमवारी उघडण्यात येऊन त्यातील अर्ज ऑनलाईन भरण्याचे कार्य ग्रामपंचायतीचे असेल. हे कार्य ग्रामपंचायत स्वतःचे डाटा एंट्री ऑपरेटर किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्या मदतीने करेल. याप्रमाणे मनरेगाच्या सर्व मागण्या ऑनलाईन भरल्या जातील ही जबाबदारी त्या ग्रामपंचायतीसाठी जबाबदार असलेले तांत्रिक सहाय्यकाची राहील. वेळ प्रसंगी तांत्रिक सहाय्यकास सुद्धा ऑनलाईनसाठी डाटा एंट्री करावी लागली तरी त्यांनी ती करावी. वरील प्रमाणे प्राप्त झालेले सर्व अर्ज ग्रामपंचायतीस / ग्रामसेवकास ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जातील.


ग्रामपंचायत / ग्रामसभा मंजुरी :

मनरेगाच्या कार्यपध्दती प्रमाणे कोणाला व किती लाभ घेता येईल याबाबत निर्णय ग्रामसभेत घेणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीच्या मान्यतेने लाभार्थ्यांची निवड करता येते. योग्य प्रचार व प्रसिद्धी केल्यानंतर प्राप्त झालेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या यादीस त्यापुढील होणाऱ्या ग्रामसभेसमोर ठेवण्यात यावे. गरजेनुसार विशेष ग्रामसभा घेण्यात यावी.

लेबर बजेट- पात्र लाभार्थ्यांचे सर्व अर्ज त्या वर्षाचे लेबर बजेटमध्ये समाविष्ट करावे.
पूरक लेबर :- तसेच ज्या लाभार्थ्यांची नावे लेबर बजेटमध्ये समाविष्ट झाली नाही व सदर लाभार्थी योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत, अशा लाभार्थीना योजनेचा लाभ मिळण्याकरिता पूरक लेबर बजेट तयार करावे. त्याकरिता दिनांक १ डिसेंबर ते पुढील वर्षांचे १४ जुलै पर्यंत “अर्ज पेटीत” किंवा ऑनलाईन प्राप्त अर्जांना त्या त्या महिन्यांचे पंचायत सभेत मान्यता द्यावी. त्यापुढील होणाऱ्या ग्रामसभेसमोर सदर यादीस प्रस्तुत करण्यात यावे.
सर्वसाधारणपणे दरवर्षी चार ग्रामसभा होतात. त्या सर्व ग्रामसभांमध्ये मनरेगाच्या अर्जातील कामांची मान्यता घेण्यात यावी. तथापि, मनरेगाअंतर्गत सर्व प्रकारची कामे मिळून १० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यावर या अर्जांना मान्यता देण्याकरिता विशेष ग्रामसभा घेण्यात यावी. तथापि, एखादे सार्वजनिक काम महत्वाचे आणि तातडीच वाटल्यास एका कामासाठी सुद्धा विशेष ग्रामसभा घेण्यात यावी.

सर्वसाधारण परिस्थितीत ग्रामसभेच्या मान्यतेनंतर आणि विशेष परिस्थितीत (शासनादेशाने ग्रामसभा घेण्यास बंदी असल्यास) ग्रामपंचायतीची मान्यता प्राप्त झाल्यावर सदर कामास एका महिन्याच्या आत तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. तांत्रिक मान्यता देण्याची जबाबदारी तांत्रिक सहाय्यकाची व प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहील.

ग्रामसभा / ग्रामपंचायतीच्या मान्यतेनंतर एका महिन्याच्या आत प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहील. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर १५ दिवसाच्या आत तांत्रिक मान्यता देण्याची जबाबदारी तांत्रिक सहाय्यकाची राहील.

मनरेगा कायद्याच्या तरतूदीनुसार जिल्हा परिषदेने शेल्फवर कामे मंजूर करावयाचे आहेत. वरीलप्रमाणे प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्राप्त कामांना जिल्हा स्तरीय समितीच्या माध्यमातून शैल्फवर घेण्यात यावे. तथापि, यासाठी कार्योत्तर मंजूरी घेण्याचे प्रावधान ठेवण्यात येत आहे.

ग्रामपंचायतनिहाय विहीरीची कामे मंजूर करतांना विचारात घ्यावयाच्या बाबी:

ग्रामपंचायतीमध्ये योजनेअंतर्गत साधारणतः प्रती वर्षी किती मजूर फुटकळ कामाची मागणी करतात, त्यातून किती मनुष्य दिवस निर्माण झाले याचा अभ्यास करून पुढील वर्षांचे नियोजन प्रस्तावित करून मंजुर करावे. विहिरीच्या कामांमध्ये मजूरी खर्चाच्या तुलनेत साहित्याचा खर्च जास्त आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीने विहिरीच्या कामांसोबत मजूरीप्रधान कामे उदा. भूसुधार, वृक्ष लागवड. फळबाग लागवड इत्यादी कामे घ्यावीत, जेणेकरून ग्रामपंचायतीच्या स्तरावर मजूरी व साहित्याचे ६०:४० प्रमाण राखणे शक्य होईल. त्याचप्रमाणे

विहिरीसाठी लाभधारक निवड करताना गावपातळीवर एका आर्थिक वर्षात मजूरी व साहित्याचे प्रमाण ६०:४० राखण्यात यावे.
अधिक विहिरींची मागणी असल्यास सुरु असलेल्या विहिरींचे कार्य पूर्ण होत जातील तसतसे पुढील नवीन विहिरींना मान्यता देण्यात यावी.
या सदराखालील सर्व बाबींची पूर्तता होत असल्यास कोणत्या ग्रामपंचायतीत एकाच वेळी कितीही विहिरींचे कामे सुरु असू शकतात. यासंदर्भात लोकसंख्येनुसार विहीर मंजूरीची अट रद्द करण्यात येत आहे.
सिंचन सुविधा म्हणून विहिरींना मंजूर करण्याबाबतच्या अटी:

केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या दिनांक २४ ऑगस्ट २०१२ च्या कार्यसंदर्भातील सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार बोरवेल, ट्यूबवेल अनुज्ञेय नाही. तथापी शासन परिपत्रक क्रमांक मग्रारो२०११/प्र.क्र.११३ /रोहयो-१०अ दिनांक १७ ऑक्टोबर, २०११ अन्वये विंधन विहिर (In Well Bore) अनुज्ञेय आहे.
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेमध्ये (PMKSY) दिलेल्या उद्दिष्टानुसार राज्यात ३,८७,५०० विहिरी घेण्यास भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार विहिर बांधण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत निहाय व तालुकानिहाय विहिरीसाठी लाभार्थ्यांची मागणी मान्य करण्यात यावी. तथापि, अद्ययावत भूजल मुल्यांकनानुसार यातील काही तालुके / गावामध्ये विहिरी घेण्यास बंदी आल्यास तशी बंदी अमलात येईल.
भूजल सर्वेक्षण यंत्रणा (GSDA) च्या व्याख्येप्रमाणे समीक्रिटीकल, क्रिटिकल, ओव्हर एक्स्प्लायटेड क्षेत्रामध्ये फक्त समूह विहिरी हाती घेता येवू शकतात. असा समूह तयार करतांना एकापेक्षा अधिक शेतकऱ्यांचा समूह असावा. समुहातील शेतकऱ्यांनी करारनामा करून उपलब्ध होणारे पाणी योग्य प्रमाणात वापरतील असे प्रमाणित करावे. असे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीमार्फत अशी कामे हाती घेण्यात यावीत.
सुरक्षित क्षेत्रात (Sate Zone) वैयक्तिक लाभाची सिंचन विहिरींची कामे हाती घेता येवू शकतात.
क्रिटिकल सेमी क्रिटिकल आणि ओव्हर एक्सप्लॉयटेड क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त जल पुनर्भरण संरचनांचे कार्य घेण्यात यावे. हे कार्य सुनियोजित पद्धतीने झाल्यास असे क्षेत्र सेफ झोनमध्ये परिवर्तित होतील. विविध झोन बाबत भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा दर तीन वर्षांनी पाहणी करते. विशिष्ट प्रयत्नातून एखादा झोन आधीच सेफ झोन मध्ये परिवर्तित झाले असे वाटत असल्यास त्याबाबत भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या निदर्शनास आणून तीन वर्षे पूर्ण होण्याआधीही यामध्ये स्पष्टता आणता येईल.
सुरक्षित पाणलोट क्षेत्रामध्ये विहिरीचे स्थळ निश्चिती करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे :-


या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संबंधित तांत्रिक सहाय्यकांनी विहीर स्थळ निश्चितीचे प्रमाणपत्र द्यावे. यासाठी सदर प्रमाणत्राव्यतिरिक्त इतर प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही.

अ) विहिर कोठे खोदावी-

दोन नाल्यांच्या मधिल क्षेत्रात व नाल्यांचे संगमाजवळ जेथे मातीचा किमान ३० से. मी. चा थर व किमान ५ मीटर खोलीपर्यंत नऊ (झिजलेला खडक आढळतो तेथे.
नदी व नाल्या जवळील उथळ गाळाच्या प्रदेशात.
जमिनीच्या सखल भागात जेथे किमान ३० से. मी. पर्यंत मातीचा थर व किमान ५ मीटर खोली पर्यंत मुरुम (झिजलेला खडक) आढळतो.
नाल्याच्या तिरावर जेथे उंचवटा आहे तेथे, परंतु सदर उंचावर चोपण किंवा चिकण माती नसावी.
घनदाट व गर्द पानांच्या झाडांच्या प्रदेशात.
नदी व नाल्याचे जुने प्रवाह पात्र जेथे आता नदी पात्र नसतांना देखील वाळु, रेती व गारगोथर थर दिसून येते.
नदीचे / नाल्याचे गोलाकार वळणाच्या आतील भूभाग.
अचानक दमट वाटणाऱ्या अथवा असणाऱ्या जागेत.
ब) विहीर कोठे खोदू नये-

भूपृष्ठावर कडक खडक दिसणाऱ्या जागेत.
डोंगराचा कडा व आसपासचे १५० मीटरचे अंतरात.
मातीचा थर ३० से.मी. पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात.
मुरमाची (झिजलेला खडक) खोली ५ मीटर पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात. (मुरुमाची खोली सर्वसाधारणपणे अस्तित्वात असलेल्या जवळपासच्या विहिरीत डोकावले असता समजते. आसपास विहीर नसल्यास जवळच्या नदी / नाल्याच्या काठावरुन मुरुमाची खोलीचा अंदाज मिळू शकतो.)
क) विहीर खोदतांना खाली काळा खडक / पाषाण लागल्यास मशीन वापरुन पुढील खोदकाम करता येते. मात्र त्याने खर्च वाढतो. म्हणून पुढील खोदकाम न करता त्या विहिरीचे खोदकाम तेथेच बंद करुन पंचनामा करुन पुर्णत्वाचे दाखले द्यावे. तसेच, १४(क) मध्ये नमूद केल्याप्रमाणे अंदाजपत्रकात मंजूर केलेल्या खोली इतके काम करूनही एखाद्या विहिरीस पाणी लागले नसल्यास तसे नमूद करुन विहिर निष्फळ ठरविण्यात यावी. अशा दोन्ही प्रकारे अपयशी झालेल्या विहिरीत पावसाचे पुरेसे पाणी यावे या करिता, शेतात चर खोदकाम व फार्म वंडिंग करून पाण्याचा निचरा विहीरी समोरच्या recharge pit मध्ये सोडावा. अशाने संपूर्ण पावसाळ्यात एकदा जरी चांगला पाऊस पडला तरी ती विहीर भरून जाईल. तसेच, गरज असल्यास विहिरीच्या खालच्या बाजूला भूमिगत बंधारा बांधावे जेणेकरुन या विहरीत साचलेले पावसाचे पाणी ३-४ महिने टिकून राहील. त्याचा उपसा करुन संबंधित शेतकऱ्याने संरक्षित सिंचन करावे व आपल्या पिकाची उत्पादकता वाढवून आपले उत्पन्न वाढवावे.

जिल्हा स्तरावरील समिती:

महाराष्ट्र हे मोठे राज्य असून प्रत्येक भागाची स्थानिक व भौगोलिक परिस्थिती भिन्न आहे. त्यामुळे या राज्यासाठी विहीरीचा एकच आकार किंवा दर निश्चीत करणे शक्य नाही. ही बाब विचारात घेऊन विहीरीच्या कामांशी संबंधित तांत्रिक व आर्थिक बाबी निश्चित करण्यासाठी जिल्हा स्तरावर खालील समिती स्थापन करण्यात येत आहे. तेव्हा खालील नमूद समितीने गरजेप्रमाणे त्यांच्या जिल्ह्यांतर्गत विहीरीचे तांत्रिक, आर्थिक मापदंड व संकल्पचित्राबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्या.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक – अध्यक्ष
मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह जिल्हा कार्यक्रम समन्वय – सहअध्यक्ष
उपजिल्हाधिकारी (मनरेगा) – सदस्य
उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी – सदस्य
कृषी विकास अधिकारी (जिल्हा परिषद) – सदस्य
भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचा प्रतिनिधी – सदस्य
कार्यकारी अभियंता, जलसंधारण (जिल्हा परिषद) – सदस्य सचिव
तसेच, समितीला आवश्यकतेनुसार तांत्रिक बाबीसाठी इतरही अधिकारी उदा. अधिक्षक/ कार्यकारी अभियंत्यांना समितीस विशेष निमंत्रक म्हणून निमंत्रीत करता येईल. प्रत्येक जिल्हयाने स्थानिक स्थितीनुसार विहीरीचे आर्थिक मापदंड रु.४.०० लक्षाच्या मर्यादित मंजूर करुन घ्यावे. प्रत्येक जिल्हयाला परिस्थितीनुसार आर्थिक मापदंड भिन्न असू शकतात. जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती भिन्न असल्यास त्या जिल्हयासाठी दोन किंवा अधिक तांत्रिक अंदाजपत्रके तयार करण्यास मुभा राहील. (उदा. पालघर जिल्हा जेथे समुद्र किनारा तसेच डोंगराळ भाग आहे.) आवश्यकतेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाची दरसुची वापरता येईल.

आर्थिक मर्यादा :-

अंदाजपत्रकासाठी संबंधित जिल्हयाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून विहिरींची मापे निश्चित करून घ्यावीत. सध्याच्या किमतीत झालेली सर्वसाधारण वाढ विचारात घेवून शासन निर्णय क्रमांक मग्रारो-२०१२/प्र.क्र.३०/रोहयो-१, दिनांक १७ डिसेंबर, २०१२ अधिक्रमीत करून शासन विहीरीच्या किमतीची कमाल मर्यादा रु. ३.०० लाखावरुन रु. ४.०० लाख करीत आहे.

सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहीरींबाबत :-


शासन परिपत्रक दि.२१ ऑगस्ट, २०१४ च्या सिंचन विहिरींच्या मार्गदर्शक सूचनांन्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना मान्यता देण्यात आली होती. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरी अनुज्ञेय नसल्याने या शासन निर्णयान्वये सदर मान्यता रद्द करण्यात येत आहे. तथापि, याआधी सुरु करण्यात आलेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पूर्ण करुन घेण्यात याव्यात. आणि त्यावरील व्यय यापूर्वी ज्या पद्धतीने करण्यात येत होते. त्या पद्धतीने करण्यात यावे. तसेच एका गावात एकापेक्षा जास्त सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरींचे कार्य सुरु असल्यास त्याच्या देयकाची अदायगी शासनमान्यतेने करण्यात यावी.

कार्यान्वयीन यंत्रणा : विहीरीच्या कामांना पंचायत समिती स्तरावरील तांत्रिक अधिकाऱ्यांनी तांत्रिक मान्यता द्यावी व सह कार्यक्रम अधिकारी तथा गटविकास अधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता द्यावी. विहीरीची कामे ग्रामपंचायतीमार्फत करण्यात यावी.

विहीर कामाच्या पूर्णत्वाचा कालावधी : विहीरीच्या कामांना प्रशासकिय मान्यता दिल्यानंतर काम शक्य तेवढे लवकर पूर्ण करण्यात यावे असे निदर्शनास आले आहे की, विहिरींची कामे चांगल्या गतीने केल्यास ४ महिन्यात पूर्ण होते. तथापि, पावसाळा ऋतू इत्यादी कारणाने काही वेळा हा कालावधी लांबू शकतो. त्यामुळे सलग दोन वर्षात विहीरींची काम पूर्ण होणे अनिवार्य राहील. तथापि, काही अपवादात्मक परिस्थितीत जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने सदर कालावधी तीन वर्षे असा करता येईल.

विहीरीच्या कामांची सुरक्षितता: मजूरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना हेल्मेट देण्यात यावीत. याबाबतचा खर्च ६% प्रशासकिय खर्च निधीतून भागवावा.

विहीरीच्या कामांची गुणवत्ता : असे निदर्शनास आले आहेत की, मनरेगांतर्गत विहिरींची गुणवत्ता अन्य शासकीय योजनांतर्गत खोदण्यात आलेल्या विहिरींच्या तुलनेत कमी असते. असे असण्याच्या कारणांचा शोध घेऊन ती कारणे दूर करण्यात यावीत. मनरेगांतर्गत खोदण्यात आलेल्या विहिरींची गुणवत्ता उत्तम अशीच राहील यासाठी सर्व संबंधितांनी एकनिष्ठ होऊन कार्य करावे.

कामाचे पूर्णत्वाचे दाखले निर्गमित करणे:

ज्या तांत्रिक अधिका-याने कामाच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता प्रदान केली आहे त्याच किंवा त्यापेक्षा उच्च पदाच्या तांत्रिक अधिकाऱ्याने पूर्णत्वाचे दाखले निर्गमित करावे.
विहित केलेल्या खोलीपेक्षा आधीच ०.४० हेक्टर क्षेत्रास पुरेल एवढे मुबलक पाणी उपलब्ध झाल्यास ग्रामसेवक, संबंधित तांत्रिक अधिकारी व विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) पंचायत समिती यांनी संयुक्त पंचनामा करून विहिर पुर्णत्वाचा दाखला निर्गमित करावा.. याबाबत संबंधित तांत्रिक अधिका-याचा निर्णय अंतिम असेल.
अंदाजपत्रकात मंजूर केलेल्या खोलीइतके काम करूनही एखाद्या विहिरीस पाणी नाही लागल्यास व अंदाजपत्रकात मंजूर केलेल्या खोली आधीच काळा खडक / पाषाण लागल्यास तसे अभिप्राय नमूद करुन विहिर निष्फळ ठरविण्यात यावी. अशा विहिरीचे संयुक्त पंचनामा करुन काम बंद करण्यात यावे.
सर्वसाधारण परिस्थितीत विहिर पूर्ण करण्याचा कालावधी २ वर्षांचा आहे. तथापि, अपवादात्मक परिस्थितीत (दुष्काळ, पूर, लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती इ.) विहिर पूर्ण करण्याचा कालावधी जास्तीत जास्त ३ वर्षांचा राहील. ३ वर्षांचा कालावधी संपल्यानंतरही विहिर पूर्ण न झाल्यास “आहे त्या परिस्थितीत कामाचा संयुक्त पंचनामा करुन विहिर पुर्णत्वाचा दाखला निर्गमित करावा.
अंदाजपत्रकाप्रमाणे मंजूर रक्कम खर्च झाली आहे मात्र बांधकाम प्रलंबित आहे, अशा स्थितीत पूर्णत्वाचा दाखला निर्गमित करु नये. अशा प्रकरणात बाबनिहाय कामाचे वस्तुनिष्ठ अंदाजपत्रक का तयार केले नाही अथवा कामाचे कार्यान्वयन करतांना काम अंदाजपत्रकाप्रमाणे का केले नाही, याचा खुलासा घेऊन उचित कार्यवाही करण्यात याची.
पूर्णत्व दाखला निर्गमित करण्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यास पर्यवेक्षकीय अधिकारी यानी तांत्रिक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन करावे.
मत्ता निर्मिती बाबतच्या नोंदी:

निर्माण झालेल्या मत्तेची नोंद ग्राम पंचायतीमधील नमुना नं. १० मत्ता नोंद वहीमध्ये घेण्यात यावा.
मत्ता निर्माण झाल्यानंतर संबंधित लाभधारकास ताबा पावतीसह हस्तांतरित करण्यात यावी. त्याची देखभाल दुरुस्ती संबंधित लाभधारक करेल.
मत्तेची नोंद संबंधित लाभधारकाच्या ७/१२ उता-यावर घेण्यात येवून त्यानंतरच विहिरीचा पूर्णत्वाचा दाखला निर्गमित करावा.
Geo Tagging :- विहिरीचे काम सुरु करण्यापूर्वी काम सुरु असताना व काम पूर्ण झाल्यानंतर, याप्रमाणे कामाच्या विविध पातळीवर छायाचित्र काढण्यात यावे व योजनेच्या संकेतस्थळावर (MIS) मध्ये टाकण्यात यावे.
कामाचे ठिकाणी कामाचे फलक लावण्यात यावेत.
मत्ता निर्मिती बाबतच्या नोंदी पूर्ण झालेल्या कामाची यादी BDO यांनी तहसिलदार यांना द्यावी व तहसिलदार यांनी संबंधित नोंदी घेणेबाबत तलाठी यांना आदेशित करावे व तसा अहवाल द्यावा. ग्रामपंचायतीमधील नमुना १० मध्ये नोंद घेतल्यानंतर लाभार्थ्यांच्या वैयक्तिक ७/१२ वरील नोंदी घेण्याची जबाबदारी संबंधित ग्रामसेवक व तलाठी यांची राहील.
सामुदायिक विहिरीबाबत नोंद: सामुदायिक विहिरीची नोंद ७/१२ मध्ये घेत असतांना ती विहीर सामुदायिक असल्याची नोंद करुन त्या विहिरीच्या लाभार्थ्यांच्या नावांची नोंद सुद्धा करावी.
कुशल निधीसाठी ग्रामपंचायतीची मदत:

कुशल कामाच्या खर्चाकरिता जे लाभार्थी वैयक्तिक खर्च करु शकणार नाही याची खात्री झाल्यास आणि लाभार्थ्याने तसे लिहून दिल्यास केवळ त्याच लाभार्थ्यांसाठी ग्राम पंचायतीने लाभार्थी यांच्याशी करार करून मटेरियल पुरवठा साठी टेंडर काढून पुरवठादाराकडून खरेदी करावी.
जे लाभार्थी कुशल कामाचा खर्च करण्यास तयार आहेत त्यांचे खात्यावर कुशल बाबींचे काम सुरु केल्यानंतर कुशल कामाचे विभाजन तीन टप्प्यात करुन प्रत्येक टप्प्याअंती मुल्यांकन करुन (M.B. Recording चे आधारे) निधी वैयक्तिक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा. M.B. Recording नंतर १५ दिवसाचे आत लाभार्थ्यांच्या खाती निधी जमा करण्यात यावा.
विहिरीचे कार्य गुणवत्तापूर्ण होण्याच्या दृष्टीने कुशल निधी अदायगीचे तीन किंवा अधिक टप्पे करण्यासाठी गट विकास अधिकारी / मुख्य कार्यकारी अधिकारी / जिल्हा कार्यक्रम समन्वयक यांनी निर्णय घ्यावा.
विहीरीच्या पाण्याचे तात्काळ व किफायतशीर वापराबाबत:

विहिरीचे काम पूर्ण होताक्षणी त्या पाण्याचा उपयोग करून शेतकरी लखपती होण्याकडे वाटचाल सुरु केली पाहिजे. करिता शक्य तितक्या लवकर त्या शेतकऱ्याकडे पंप व सोलार किंवा विजेची व्यवस्था व्हायला पाहिजे.
शासनाच्या इतर कोणत्याही विभागाच्या योजनेच्या अभिसरणातून पंप, विज जोडणी, पाण्याच्या किफायतशीर वापरासाठी ठिबक / तुषार सिंचन या सर्वांची व्यवस्था करण्यात यावी.
याकरिता संबंधित महावितरण कंपनीस आवश्यक असलेला निधी ग्रामपंचायतीने १५ वा वित्त आयोग वा ग्राम पातळीवरील इतर योजनेमधून करुन त्वरीत लाभार्थीना या योजनाचा लाभ मिळणेबाबतची कार्यवाही करावी. (५ ते १० अश्वशक्तीचे पंप व विजजोडणी) मनरेगाच्या कामांना प्राथम्याने मंजूरी देण्याबाबत उपजिल्हाधिकारी (मनरेगा) मार्फत महावितरण कंपनीकडे विनंती करण्यात यावी. त्याचप्रमाणे विद्युतपंपाऐवजी जास्तीत जास्त सोलार पंप उर्जा विभाग तसेच अन्य शासकीय योजनांशी अभिसरणातून उपलब्ध करण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी.
प्रत्यक्ष विहिर खोदतांना येणाऱ्या अडचणी:


प्रत्यक्ष विहिर खोदताना Hard Strata लागल्यास आणि ते खोदकाम अंगमेहनतीने करणे शक्य होणार नाही अशी खात्री पटल्यास संबंधित तांत्रिक सहाय्यकाने तसा दाखला द्यावा. याप्रमाणे दाखला दिल्यानंतर पुढील खोदकाम मशीनरीने करण्यात यावे. गरजेनुसार Control Blasting चा वापर करता येईल.

अनिवार्य बाबी:

MIS वर सर्व प्रकारचे नोंदी घेणे अनिवार्य राहील.
सदर कामाचे सामाजीक अंकेक्षण अनिवार्य असल्याने अकुशल व अर्धकुशल कामावरील खर्चाची सर्व प्रमाणके (Vouchers), पावत्या, सामाजीक अंकेक्षणासाठी उपलब्ध करणे अनिवार्य राहील.
या (SOP) मानक ऑपरेटिंग प्रक्रियेने राज्यभरात शक्य तितक्या अधिक विहिरी खोदण्यासाठी सर्वांनी एकनिष्ठ होऊन कार्य करावे. यापुर्वीचे कोणतेही शासन आदेश या SOP पेक्षा वेगळे असल्यास आणि त्याने विहिर खोदण्याच्या कार्यास शिथिलता येत असल्यास ते सर्व आदेश या आदेशाद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहेत. तसेच, कोणत्याही जिल्हा, तालुका किंवा अधिकारी यांनी या मानक ऑपरेटिंग प्रक्रियेपेक्षा वेगळी प्रक्रिया अवलंबू नये. राज्यात विहिर खोदकामाची गती व गुणवत्ता वाढविण्यासाठी नवीन सूचनांचे शासन स्वागत करील.

मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर अनुदान योजना नमुना अर्ज: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र अंतर्गत सिंचन सुविधा म्हणून वैयक्तिक लाभाची सिंचन विहीर मंजूर करणेसाठी नमुना अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.




GR बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

महाराष्ट्र वनविभाग भरती | Van Vibhag Bharti 2023 Maharashtra


महाराष्ट्र वनविभागांमध्ये विविध पदांसाठी एकूण 9 हजार जागेवर मेगाभरती जाहीर! 2023! लगेचच अर्ज करा!


नमस्कार मित्रांनो,आज आपण महाराष्ट्र राज्याच्या वनविभागांमध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी भरती होणार आहे .याविषयी आपण या लेखात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.वनविभागात कार्य करू इच्छिणाऱ्यासाठी ही एक मूल्यवान संधी आहे.तरी सर्वांनी याची दखल घ्यावी.महाराष्ट्र राज्याच्या वनविभागांमध्ये संवर्गनिहाय विविध पदांच्या एकूण 9 हजार 640 जागेवर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.या भरतीसाठी पात्र असलेल्या उमदवारांकरून विहीत पद्धतीने आवेदन मागविण्यात येणार आहे

Van Vibhag Bharti 2023 Maharashtra:
दि.13.02.2023 रोजी घेतलेल्या बैठकीमध्ये प्रधान सचिव यांनी महाराष्ट्र वनविभागांमध्ये भरती प्रक्रियेबाबत
तातडीने कार्य होत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे . व यामुळे वनविभागातील संवर्गनिहाय पदभरती प्रक्रिया वेगाने होण्याकरीता आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत .

व तसेच संवर्ग क मधील ग्रंथालय परिचर ,सहाय्यक ,नौका तांडेल ,पहारेकरी,लॉच चालक , पशु परिचर ,खलाशी,सहाय्यक स्वयंपाकी इत्यादी पदांचे
मागणीपत्र तात्काळ जिल्हाधिकारी यांना पाठविण्याचे व तसे संबंधित कार्यालयास अवगत करण्याचे राज्यातील सर्व मुख्य वनसंरक्षकांना आदेशित करण्यात आलेले आहेत .

 
तसेच वनरक्षकांच्या पदभरती करीता अनुसूचित क्षेत्रातील पदे व बिगर अनुसूचित क्षेत्रातील पदे निश्चित करण्याचे आणि त्यानुसार बिंदुनामावली प्रमाणित करुन पदांचे मागणीपत्र विहीत विवरणपत्रात वनविभागनिहाय , व तसेच सर्व वनविभाग मिळून वनवृत्ताचा एकत्रित गोषवारा सादर करण्याचा आदेशही देलेला आले.

महाराष्ट्र वनविभाग वन मंत्रालयाच्या अधीन आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या वनव्यवस्थेच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार आहे. वनविभागात विविध पदांची माहिती खालीलप्रमाणे दिली आहे:

१. वनसेवक: हे पद जिल्हा वन क्षेत्रांतर्गत वन संरक्षण, प्रबंधन, आणि सुरक्षा संबंधी कामांची अधिकृत सहाय्यक पद आहे.

२. वनरक्षक: हे पद वन क्षेत्रांतर्गत वन संरक्षण संबंधित कामांची जबाबदारी घेते. याच्या अंतर्गत वन तपासणी, वनदूत, वन बीड आणि सर्वेक्षण, वन निरीक्षण, वन बांधकाम, आणि वन फंड व्यवस्थापन शामिल आहेत.

३. वन्यजीव निरीक्षक: हे पद वन्यजीवन संरक्षण संबंधित कामांची अधिकृत सहाय्यक पद आहे. याच्या अंतर्गत वन्यजीवनाची संगणक ट्रॅकिंग, जंगलातील प्रदूषण तपासणी, प्राणी व संवर्धन, जंगली पशुपक्षी आणि त्यांच्या संरक्षण संबंधित काम शामिल आहेत.

४. वन प्रबंधक

महाराष्ट्र वनविभागांमध्ये विविध पदांसाठी अर्ज कसा करावा?
महाराष्ट्र वन विभागातील विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी खालील पद्धती अनुसरण करा:

How to Apply For Van Vibhag

१. महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करा: https://www.mahaforest.gov.in/
२. वेबसाइटवर उपलब्ध जाहिराती पाहा आणि त्यांच्या नियमांचे पालन करून अर्ज करा.
३. जाहिरातीमध्ये दिलेल्या अर्ज पत्रात आवश्यक माहिती भरा आणि संबंधित दस्तऐवज सहित अर्ज करा.
४. अर्ज करण्यापूर्वी सुनिश्चित करा की आपल्याकडे संबंधित पदासाठी अभिज्ञता आहे आणि आपण योग्य उमेदवार आहात.
५. आवेदन स्वीकृत झाल्यास, आपल्याकडून इमेल किंवा मोबाइल संदेश मिळविला जाईल.
६. विभागाच्या अधिकारींनी निवडलेल्या उमेदवारांची यादी तयार करून जाहीर केली जाईल.

असे करून आपण महाराष्ट्र वन विभागातील विविध पदांसाठी अर्ज करू शकता. आपण वेबसाइटवर उपलब्ध जाहिराती पाहू शकता आणि त्यांच्याशी संपर्क साधू शकता जर आपण अधिक माहिती घेण्याकरिता वन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन माहिती घेऊ शकता. https://www.mahaforest.gov.in/

कृषी सल्ला: भाजीपाला पिके उन्हाळी हंगामातील वांगी, भेंडी, घोसाळी, गवार, काकडी, शिरीदोडका,मिरची,कोबी या भाजीपाल्याचे नियोजन, काळजी कशी घ्यावी याची माहिती घेऊ. 🥦🥒🍆

मार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू नये. उन्हाळी सूर्यफूल पिकास पेरणीनंतर ३० दिवसांनी हेक्टरी ३० किलो नत्र युरियाद्वारे द्यावे.

उन्हाळी भुईमूग

मार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू नये.
निंदणी व कोळपणी करून पिकातील तणाचे नियंत्रण करावे.
मावा, तुडतुडे, पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रण करावे. नियंत्रण - फवारणी प्रति लिटर डायमिथोएट (३० टक्के) १ मि.लि. किंवा स्पिनोसॅड (४५ एस.पी.) ०.३ मि.लि.
टिक्का रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास फवारणी करावी. नियंत्रण - फवारणी प्रतिलिटर पाणी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा मॅंकोझेब २.५ ग्रॅम. सूचना : दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने पुन्हा करावी.
तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फवारणी करावी. नियंत्रण - फवारणी प्रतिलिटर पाणी मॅंकोझेब ६३ टक्के अधिक कार्बेन्डाझिम १२ टक्के (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम 
लाेहाची कमतरता आढळल्यास फेरस सल्फेट ०.५ टक्के याप्रमाणात (५० ग्रॅम प्रति १० लिटर) फवारणी करावी.  
उन्हाळी सूर्यफूल :

पेरणीनंतर ३० दिवसांनी हेक्टरी ३० किलो नत्र युरियाद्वारे द्यावे.
निंदणी करून पीक तणविरहित ठेवावे.
पाण्याच्या पाळ्या ८-१० दिवसांच्या अंतराने द्याव्यात.
पिकास बोंडे लागणे, फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये.
केसाळ अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास किडग्रस्त पाने अंडीपुंज अळ्यासहित तोडून रॉकेलमिश्रित पाण्यात बुडवावीत. त्यानंतर फवारणी करावी. नियंत्रण - फवारणी प्रतिलिटर पाणी क्विनॉलफॉस २ मि.लि.
पानांवरील काळे ठिपके (अल्टरनेरिया) रोगाचे नियंत्रण करावे. नियंत्रण - फवारणी प्रतिलिटर पाणी मॅंकोझेब २.५ ग्रॅम
विषाणू उदा. केवडा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास रोगग्रस्त झाडे उपटून टाकावीत. रोगप्रसारक किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी. नियंत्रण - फवारणी प्रतिलिटर पाणी डायमिथोएट (३० टक्के) १ मि.लि.
पीक फुलावर असताना सकाळी ८ ते १० वाजेच्या दरम्यान तळहाताला सुती कपडा बांधून फुलावरुन हात फिरवावा किंवा एक फूल दुसऱ्या फुलावर हळुवार घासल्यास फुलामध्ये दाणे भरण्याचे प्रमाण वाढते.
उन्हाळी सोयाबीन :  

खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी उन्हाळी हंगामात सोयाबीन पीक घेतले आहे. ढगाळ वातावरणात त्यावर बुरशीजन्य करपा, तांबेरा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
बुरशीजन्य करपा
नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी
मॅंकोझेब २.५ ग्रॅम
तांबेरा रोग नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी मॅंकोझेब ६३ टक्के अधिक कार्बेन्डाझिम १२ टक्के (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम
भाजीपाला पिके :     

कांदा पिकास पाण्याच्या पाळ्या ७ ते ८ दिवसांच्या अंतराने द्याव्यात.
कांदा पिकावर फूलकिडीचा प्रादुर्भाव आढळल्यास फिप्रोनील (५ टक्के इ.सी.) २ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कांदा बीजोत्पादनात पिकाच्या धांड्यावर रसशोषण करणाऱ्या किडींमुळे लिफब्लॉचचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. नियंत्रणासाठी डायमिथोएट १ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
उन्हाळी मिरचीस ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
मिरची पिकावरील तुडतुडे, फूलकिडे व कोळी यांच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट (३० टक्के) १ मि.लि. अधिक ८० टक्के विद्राव्य गंधक २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात मिसळून फवारणी करावी.
फेब्रुवारी महिन्यात लावलेल्या टोमॅटो पिकास १० दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.
फ्लॉवर पिकाच्या गड्ड्यांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पिकाची पाने खाली गड्ड्यावर बांधावीत. त्यामुळे गड्डे पिवळे पडणार नाहीत.
वांगी, भेंडी, दिलपसंत (टिंडा), घोसाळी , गवार, काकडी, शिरीदोडका या भाजीपाला पिकात तणनियंत्रण करावे. तसेच पाण्याच्या नियमित ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाळ्या द्याव्यात.
टीप : काही कीटकनाशक लेबल क्लेमनुसार आहेत तर काही विद्यापीठाच्या शिफारशी आहेत.

संपर्क : डॉ. यु. एन. आळसे, ७५८८०८२१३७ कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, डाॅ.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.)

Source: agrowon

Friday, April 7, 2023

भारतीय हवामान खात्याचा अंदाज ७ एप्रिल २०२३

७ एप्रिल, ७.३० am.
जिल्हे नांदेड, लातूर, उस्मानाबाद ... TSRA🌩🌩
मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुढच्या २,३ तासात‌.
- IMD
मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार ढगा़ळ आकाश ..
Source: https://twitter.com/Hosalikar_KS/status/1644161044976373760?t=xuBU6iqAkOqUJaj6F47q0Q&s=19

टोमॅटो उत्पादक शेतकरी, नुकसानापासून वाचण्यासाठी हा पर्याय करू शकता

टोमॅटो पावडर बनवण्यासाठी टोमॅटो वाळवणे.


 मागणीपेक्षा जास्त पुरवठा झाल्याने टोमॅटोच्या शेतीत शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

  बहुतांश फळे शेतात किंवा बाजारात सडतात. याचे कारण असे की टोमॅटोचे मूल्य कसे जतन करावे किंवा कसे वाढवायचे हे शेतकऱ्यांना माहीत नाही.

 बहुतांश शेतकरी त्यांच्या एकूण उत्पादनापैकी निम्म्याहून अधिक उत्पादन गमावतात.
 टोमॅटोची पावडर वाळवून तयार केल्याने हा कचरा टाळता येईल, अतिरिक्त टोमॅटोचा चांगला वापर होईल आणि काढणीनंतर होणारे नुकसान कमी होईल. यामुळे कमी पुरवठ्याच्या काळातही मदत होईल, कारण ग्राहक कॅन केलेला टोमॅटो वापरतील

 सर्व अतिरिक्त ताजे टोमॅटो संरक्षित करण्यायोग्य पावडरमध्ये बदलले पाहिजेत, जे ऑफ-सीझन विकले जातील.

 टोमॅटो पावडरसह, ग्राहक फक्त स्वयंपाक करताना पावडर घालतात. कोणतेही कृत्रिम रंग, ऍडिटीव्ह किंवा संरक्षक नाहीत. टोमॅटो पावडर स्टोरेजमध्ये एक वर्षापेक्षा जास्त काळ टिकू शकते


नाथसागर जायकवाडी धरण पाणीसाठा ०४/१०/२०२३ 💧⛈️🌊

 नमस्कार मित्रांनो,🙏 जायकवाडी धरण पाणी पातळी:👇 आजची पाणी पातळी: ४७.६४%👈 मागच्या वर्षी या दिवशी 👍: ९९.४४% बाकीच्या धरणाबद्दल माहिती पाहिज...